मंगलवार, 7 मई 2013

जैसे ज्याचे कर्म तैसे-----पर्व दुसरे




प्रिय मित्रहो ....

' मला समजलेला देव ..अल्लाह ..वगैरे ! या माझ्या आत्मकथनात्मक लेखमालेच्या पहिल्या पर्वाला फेसबुक वरील मित्रांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे माझा उत्साह दुणावला आहे .. आयुष्यातील काही निवडक घटना ज्या बहुधा इतरांच्या वाट्याला येत नाहीत ..त्या फेसबुक वरील मित्रांना सांगून ..व्यसनाधीनता या भयंकर संकटा बद्दल जनजागृती व्हावी .. जीवनावरील श्रद्धा वाढावी ..अहंकारा च्या नशेत आणि स्वतच्या इच्छेने जिवन व्यतीत करताना झालेली ससेहोलपट इतरांना सांगावी ..राग ..खुन्नस .. द्वेष .. ..तिरस्कार या नकारात्मक भावना जोपासल्या गेल्या तर त्याचे परिणाम कसे ' बुमरँग ' होतात याबद्दलचे अनुभव मांडून ..श्रद्धा ..प्रेम .. निस्वार्थी सेवा ..करुणा ..बंधुत्व ..या भावना वाढीस लागून समाजातील विविध भेदांचे निराकरण करण्याची ओढ निर्माण व्हावी ..या हेतूने लिहायला घेतलेल्या लेखांना आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच एका दीर्घ लेखमालेचे स्वरूप प्राप्त झालेय .. त्या बद्दल मी सर्वांचा शतशः ऋणी आहे !

या लेखमालेचे पुस्तक होण्याची प्रक्रिया सुरु झालीय ..पहिल्या पर्वात माझा बालपणापासून ते व्यसनाधीनता .. नैतिक अधःपतन...पराभव ..निराशा ..व्यसनमुक्तीचा..पुनर्जन्माचा पहिला वाढदिवस साजरा होईपर्यंत लिखाण आपण वाचले आहेच ..आता या दुसऱ्या पर्वात व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून काम करताना आलेले अनुभव ... विविध सामाजिक समस्या ..व्यसनाधीन व्यक्तींचे दारुण अनुभव ..व्यसनमुक्ती टिकवताना येणारे अपयश ..त्याची कारणे ..पालकांचे दृष्टीकोन .. .. व्यक्तिगत जीवनात स्थिरावताना येत असणाऱ्या अडचणी याबद्दल लिहिणार आहे या दुसऱ्या पर्वाला देखील आपण असाच भरघोस प्रतिसाद देवून माझा उत्साह ..कार्यप्रेरणा जागृत ठेवण्यास मदत कराल अशी खात्री आहे .

3 टिप्‍पणियां: